पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच निगडी येथील पुर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे आणि उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमास माजी नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका सुमन नेटके, अनुराधा गोरखे, कमल घोलप, उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक ,जेष्ठ नेते प्रल्हाद सुधारे, किसन नेटके, भाऊसाहेब आडगळे, संदीपान झोंबाडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, पदाधिकारी, नितीन घोलप, सचिन दुबळे, विठ्ठल कळसे, गणेश साठे, अक्षय उदगीरे, सोमेश्वर बावणे, यादव खिलारे, अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्त्या झुंबर शिंदे, केशर लांडगे, मीना कांबळे, सविता आव्हाड, मीना खिलारे, कुसुम कदम, मीरा अल्लाड, रेखा दोनघे, अनिता गायकवाड, जनाबाई वैरागे, विनू राजगुरू, भारती नुरी, मंगल रूपटक्के, आशा शहाणे आदी उपस्थित होत्या.