पिंपरी – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालये स्थापन करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 3 ठिकाणी निवडणुक कार्यालये सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दि.9 डिसेंबर पर्यंत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये 1 जानेवारी 2024 पर्यंत किंवा त्याच्या आधी 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
त्यानुसार मतदार यादीत नव्याने नाव नोंदविणे आणि विविध प्रकारच्या दुरुस्तींसाठी मतदारांना अर्ज करण्यासाठी येणाऱ्या अडचणी किंवा मतदार यादीची पडताळणी किंवा प्रारूप यादीवर सूचना, हरकती घेण्यासाठी या कार्यालयांमध्ये जाऊन माहिती मिळविता येणार आहे.
शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालये
चिंचवड – यशवंतराव चव्हाण माध्यमिक शाळा, ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव.
पिंपरी – डॉ. हेडगेवार भवन सेक्टर नं. 26 आकुर्डी.
भोसरी – राजीव गांधी माध्यमिक महाविद्यालय, नवीन इमारत दुसरा मजला, नेहरुनगर