पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे मधील ज्योतिबानगर येथे एका कारखान्याला आग लागली. या आगीमध्ये सहा कामगारांचा (6 worker died) होरपळून मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी घडली. ( fire in Candle factory )
ज्योतिबा नगर येथे वाढदिवसाच्या केक वर लावल्या जाणाऱ्या मेणबत्ती तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीत शुक्रवारी दुपारी आग लागली. या घटनेमध्ये सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत. ( Pimpri Chinwad news)
शुक्रवारी दुपारी अग्निशमन विभागाला माहिती मिळाली की, ज्योतिबा नगर येथे एका कंपनीला आग लागली. त्यानुसार पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब घटनास्थळी दाखल झाले जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. कंपनीमध्ये एकूण 14 कामगार काम करत होते. आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येण्यापूर्वी नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलवले होते. घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शिखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ( Shekhar singh )
वाढदिवसाच्या केक वर लावल्या जाणाऱ्या स्पार्कलिंग मेणबत्ती या कारखान्यात तयार केल्या जात होत्या. काम करताना शटर लाऊन घेतले जात होते. त्याच वेळी कारखान्यात स्पार्क होऊन आग लागली. तसेच कारखान्यात स्फोट झाला. यामुळे आग भडकली. स्फोटामुळे कारखान्याच्या भिंतीला तडे गेले आहेत.