पिंपरी – पावसाळ्यात शहराच्या विविध भागातील अनेक रस्त्यांवर मोठी चाळण झाली होती. पालिकेच्या आठही प्रभागात पावसाळा सुरू झाल्यापासून 8 हजार 229 खड्डे पडल्याचे आढळून आले आहे. यापैकी 16 ऑक्टोंबरअखेर पर्यंत 7 हजार 812 खड्डे पूर्णतः बुजविण्यात आले आहेत. पावसाळ्यात मुरूम, खडी आणि सिंमेंट कॉंक्रिटने खड्डे बुजविले जातात. मात्र, आता पावसाळा संपला असून सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहे. यासाठी 30 नोव्हेंबरची डेडलाइन देण्यात आल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.
शहर आणि परिसरात जूनअखेर पावसाला सुरूवात झाली. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी शहरात 633 खड्डे होते. पावसाळ्यात शहराच्या विविध भागात 8 हजार 229 खड्डे पडले होते. आत्तापर्यंत डांबर, कोल्डमिक्सने 2 हजार 749, बीबीएमने म्हणजे खडीने 1233, डब्लुएमएमने 2738 खड्डे, पेव्हिंग ब्लॉक बसवून 407 खड्डे भरण्यात आले. मुरूम, खडी आणि सिंमेंट कॉन्क्रीटने 685 खड्डे रस्त्याच्या बरोबरीत भरून घेतले. अशा प्रकारे 7 हजार 812 खड्डे पूर्णतः बुजविले असून शहरात फक्त 417 खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडताच तत्काळ मुरूम, खडी आणि सिंमेंट कॉन्क्रीटने खड्डे बुजविले जातात. मात्र, आता पावसाळा संपला असून सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयाना 30 नोव्हेंबरपर्यंत खड्डे बुजवून घ्यावेत, अशा सुचना दिल्या आहेत.
मकरंद निकम, शहर अभियंता
प्रभाग एकूण खड्डे बुजविलेले खड्डे बाकी खड्डे
अ 583 549 34
ब 1494 1430 64
क 1139 1088 51
ड 1555 1446 109
इ 382 366 16
फ 806 782 24
ग 578 548 30
ह 676 647 29
प्रकल्प 1016 956 60
एकूण 8229 7812 417