पिंपरी -महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद संभाजी बारणे यांच्या हातावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने घड्याळ बांधत पक्षामध्ये घेतले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संभाजी बारणे यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्योजक अभय मांढरे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, नगरसेवक विनोद नढे आदी उपस्थित होते.
थेरगाव परिसरातून संभाजी बारणे यांनी 2017 मध्ये निवडणूक लढवली आहे. अवघ्या 400 मतांच्या फरकाने बारणे यांना निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला होता. महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्यपदी बारणे यांनी काम केले आहे.