चिमुकल्याचं स्वप्न ऐकून पायलट राहुल गांधींनी केलं असं काही; व्हिडीओ होतोय व्हायरल !

नवी दिल्ली – राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या काँग्रेसनेते राहुल गांधींना आपण नेहमीच विरोधकांवर टीका करताना पाहतो. तेच राहुल गांधी कार्यक्रमात किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याला नेहमीच प्राधान्य देतात. त्यांचे या कार्यक्रमांतील अनेक व्हिडीओ व्हायरलही होतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी एका चिमूरड्याला एअरक्राफ्टची सैर घडवली.

राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. एका नऊ वर्षांच्या मुलाचं पायलट होण्याचं स्वप्न आहे हे राहुल यांना कळलं. त्यांनी त्या चिमुकल्याला पायलट होण्याआधीच विमानाची सफर घडवली.

राहुल एका हॉटेलमध्ये बसले असताना चिमुकल्याशी त्याचे स्वप्न आणि ध्येयाबाबत गप्पा मारताना पाहायला मिळतात. मुलगा म्हणतो, मला पायलट व्हायचं. त्यावर राहुल म्हणतात मी देखील पायलट आहे हे माहित आहे का ? त्यानंतर या व्हिडीओत राहुल त्या मुलाला एअरक्राफ्टची सैर घडवून आणल्याचं पाहायला मिळतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Gandhi (@rahulgandhi)


“कोणतंही स्वप्न खूप मोठं नसतं. आम्ही अद्वैतचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता आपलं कर्तव्य आहे की आपण एक समाज आणि एक असा पाया तयार करू जो त्याला उड्डाण करण्याची संधी देईल” असं राहुल यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.