मुंबई – अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. शिबानी अनेक हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक लुक चाहत्यांच्या पसंतीस पडतो. आता पुन्हा एकदा तिने खास फोटोशूट केले आहे. शिबानीने तिचे काही सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शिबानीने काळ्या रंगाच्या फ्लोरल गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. यावेळी शिबानीने बोल्ड मेकअप केला असून मेसी बन हेअरस्टाइल केली आहे. यात तिने हटके पोझ दिल्या आहेत. यात ती ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या ही पसंतीस पडला आहे.
दरम्यान, मागील वर्षी शिबानी दांडेकर अभिनेता फरहान अख्तरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. फरहान आणि शिबानी मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2022 ला या दोघांनी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केलं. त्यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.