मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळी एका वेगळ्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. लवकरच प्राजक्ताचा नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘तीन अडकून सिताराम’ नुकताच या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यानंतर आता चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केलं आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या सिनेमाचे निर्माते आहेत.
चित्रपटाबद्दल लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, नावावरून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, नेमका हा चित्रपट आहे तरी काय? तर टिझरवरून प्रेक्षकांना अंदाज आला असेलच. यात काही रहस्य आहेत, गुंतागुंत आहे आणि हा गुंता अखेर सुटणार का? हे यात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. ‘तीन अडकून सीताराम’चा खरा अर्थ प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल.” येत्या २९ सष्टेंबरला चित्रपटगृहात हा रिलीज होणार आहे.