नवी दिल्ली – देशातील इंधन कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत असतात. आणि सकाळी सहा वाजता नवीन दर लागू केले जातात.
तेल विपणन कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी यंदाच्या रविवारी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशाची राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता आदीसह देशातील विविध शहरांमध्ये रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून, सध्या तरी पूर्वीचेच दर लागू राहतील.
त्यामुळे आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये असून, डिझेलची किंमत 86.71 प्रति लिटर आहे. तर मुंबई मध्ये पेट्रोल-डिझेलचा दर 109.96 आणि 94.13 प्रतिलिटर इतका आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून इंधन दर गगनाला भिडल्याने विरोधकांनी देशभरात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शनांचे सत्र आरंभले आहे. तसेच सामान्य नागरिकांच्या खिशाला ही मोठी कात्री लागली आहे.