रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरही परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110 च्या वर गेली आहे. गेल्या सात वर्षांतील ही सर्वोच्च किंमत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमतीत आज पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर, ही किंमत प्रति बॅरल 110.23 पर्यंत वाढली आहे. जुलै 2014 नंतर प्रथमच कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110 वर पोहोचली आहे.
याशिवाय अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या किमतीतही 4.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याची किंमत सप्टेंबर 2013 पासूनची सर्वोच्च 108.41 प्रति बॅरल झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यूपी, पंजाबसह पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
2021 च्या दिवाळीनंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र याउलट कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. रशियाने युक्रेनवर बॉम्बफेक केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अलीकडेच, कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेल्या होत्या, त्यानंतर आज किंमत प्रति बॅरल 110 डॉलरच्या पुढे गेली आहे.