नवी दिल्ली – उद्योगांनी मागणी केल्याप्रमाणे वाणिज्य मंत्रालयाने पीपीई किटस् निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक महिन्याला 50 लाख किटस् निर्यात केले जातील. या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली आहे.
सुरुवातीच्या काळात अशी किटस् भारताला आयात करावी लागत होती. त्यासाठी विमाने उपलब्ध करावी लागत असल्यामुळे खर्च वाढत होता. मात्र, भारतातील उद्योगांनी देशांतर्गत उत्पादनावर भर दिल्यामुळे आता याबाबत भारत स्वावलंबी झाला असून अतिरिक्त 50 लाख किटस् प्रत्येक महिन्याला निर्यात केले जाणार आहे.