नवी दिल्ली – सर्वच कंपन्यांनी विशेषतः ई-कॉमर्स कंपन्यांनी पॅकेजमधून प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचे ठरविले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
अॅमेझॉनने सांगितले की, 50 वितरण केंद्रांमधून सिंगल युज प्लॅस्टिक हद्दपार करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट आणि इतर कंपन्यांही या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहेत. इ- कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तू पाठविल्या जातात. तेथे प्लॅस्टिकचा जास्त वापर होत होता. त्यामुळे या कंपन्यांनी प्लॅस्टिकचा वापर कमी केल्यामुळे पर्यावरण संतुलनाला मदत मिळेल.