कोल्हापूर : शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केले आहे . नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आहेत, असं म्हणत शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केलं आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात संतापाची लाट उलटली आहे अनेक राज्यात हिंसक आंदोलन होऊन आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे याबाबत शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष संभाजी भिडे यांना विचारल असता ते म्हणाले, या कायद्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या कोट्यवधी भारतीयांना आनंद झाला पाहिजे.
आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे दुर्दैव आहे. स्वार्थ हाच ज्यांचा धर्म आहे, त्यांनी कायद्याला विरोध करत गालबोट लावण्याचा प्रयत्न करुन, नंगानाच सुरु केला आहे. तो देशद्रोह आहे, असं त्यांनी म्हटलंय. देशभक्त असलेल्या कुठल्याही नागरिकाला या कायद्याचं कौतुक वाटेल.
हे मागेच व्हायला हवं होतं. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा नागरिकता सुधारणा कायदा लागू करा अशी मागणी केली होती. त्याचा व्हिडोओही आता व्हायरल होतोय, असं भिडे यांनी नमूद केलं. शिवसेनेनं या कायद्याला विरोध केलेला नाही, करणार नाही, शिवसेनेच्या भूमिकेबाबत गैरसमज पसरवला जातोय, असं भिडे म्हणाले.
संभाजी भिडे यांनी यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. नाही त्या फालतू माणसाबद्दल विचार करून राष्ट्राने आपला वेळ वाया घालवू नये. ज्याला काही उंची नाही अशी माणसं राजकारणात आले हे देशाचं दुर्दैव आहे, असा घणाघात भिडे यांनी केला