मुंबई: कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. आरोय विभाग, पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार मोठ्या ताकदीने या परिस्थितीचा सामना करीत आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राज्य सावरण्यासाठी पवारांची धडपड अद्भुत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज अनेक विषयावर चर्चा झाली. सरकारच्या कामा विषयी ते समाधानी आहेत. लाॅकडाऊनमुळे जनता त्रस्त असलयाने ते चिंतेत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील माहिती ते मिळवत आहेत. सुचना देत आहेत. राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अदभुत आहे.
देशाचे नेते श्री. शरद पवार यांच्याशी आज अनेक विषयावर चर्चा झाली. सरकारच्या कामा विषयी ते समाधानी आहेत. लाॅकडाऊन मुळे जनता त्रस्त असलयाने ते चिंतेत आहेत. राज्याच्या कानाकोपरयातली
माहिती ते मिळवत आहेत. सुचना देत आहेत. राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अदभुत आहे. @PawarSpeaks— Sanjay Raut (@rautsanjay61) May 17, 2020
तसेच राऊत म्हणाले, वानखेडे तसेच ब्रेबाॅन सारख्या क्रिकेट मैदानावर करोना रूग्णांसाठी हॉस्पिटल उभारली जाणार नाहीत ही आदित्य ठाकरे यांची भुमिका योग्यच आहे. वानखेडे कोरोना रूग्णांसाठी घेणार, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. वानखेडे वापरात आहे. ब्रेबाॅन रिकामे आहे इतकेच. मैदाने वाचवायलाच हवीत.