पिंपरी -हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माभिमानासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. हा इतिहास पवार कुटुंबीय विसरले आहेत. महापुरूषांचा अपमान हेच पवारांचे अभियान आहे, अशी टीका भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी केली आहे.
धर्मासाठी झिजला छावा औरंग्याचा जाणून कावा,
अजित पवारांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे.असे वक्तव्य भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असे वादग्रस्त विधान केले. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने निगडी येथील भेळ चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी, प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अजित कुलथे, जिल्हा सरचिटणीस दिनेश यादव,दीपक नागरगोजे, जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष शिवराज लांडगे, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, पंकज शर्मा, सतीश नागरगोजे, प्रशांत बाराथे, युवराज ढोरे, राहुल खाडे, मंगेश घाडगे, मंडल अध्यक्ष सुमित घाटे, सनी बारणे, सागर घोरपडे, केतन पाटील, विद्यार्थी संयोजक दिगंबर गुजर, सहसंयोजक अजय मोरे, साहिल कांबळे, कल्पेश साळवी, सोशल मीडिया संयोजक विक्रांत गंगावणे, संयोजक प्रथमेश सकपाळ, वरद जोशी उपस्थित होते.