पुणे – महापालिकेने करोना चाचण्यांची संख्या कमी केल्याने रुग्ण संख्येत घट होत आहे. मागील पाच दिवसांच्या तुलेनत चाचण्यांची संख्या 3 हजार 400 ने कमी केली आहे. सोमवारी दिवसभरात 1 हजार 839 नमुने घेतले. यामध्ये 391 नवे बाधित आढळून आले.
दि. 1 ऑक्टोबरला शहरात 5 हजार 260 चाचण्या झाल्या. यामध्ये 1 हजार 36 बाधित आढळून आले. त्यानंतर दि. 2 ऑक्टोबरला 5 हजार 724, दि.3 तारखेला 4 हजार 682, दि.4 ला 4 हजार 580 आणि पाच तारखेला फक्त 1 हजार 839 चाचण्या झाल्या.
यावरून दिवसेंदिवस चाचण्यांची संख्या कमी होत आहे. दरम्यान, सोमवारी 917 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच व्यक्ती या पुण्याबाहेरील आहेत.
905 करोना रुग्णांची तब्येत गंभीर असून 507 व्यक्ती व्हेन्टिलेटरवर आहेत. सद्य:स्थितीम बाधितांची संख्या 1 लाख 49 हजार 790 वर गेली असून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 14 हजार 841 इतकी आहे.