सहारणपूर – माजी केंद्रीय मंत्री रशिद मसूद यांचे आज निधन झाले ते 73 वर्षांचे होते. रूरकीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना करोनाची लागण झाल्याचे निदान तेथे झाले होते. त्यातच त्यांचे निधन झाले अशी माहिती त्यांचे पुतणे इम्रान मसूद यांनी दिली. त्यांना करोना झाला होता पण त्यातून ते बरेही झाले होते.
तथापि करोनामुळे त्यांना अन्य काही समस्या निर्माण झाल्या होत्या, असे ते म्हणाले. मसूद हे सहारणपूर मतदारसंघातून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
1989 साली ते जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले होते व त्याच पक्षाच्या मंत्रिमंडळात त्यांनी आरोग्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा देशातील राजकारणाचाही गाढा अभ्यास होता.