नवी दिल्ली : रामदेव बाबा यांचे जवळचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना दिल्लीच्याएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीतील दुखणे आणि अस्वस्थतेमुळे त्यांना हरिद्वार येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी तेथील डॉक्टरांकडून थेट एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बाळकृष्ण यांना ‘आल्टर्ड कान्शसनेस’ चा त्रास आहे. या या आजारात रुग्ण आपल्या आजुबाजूच्या व्यक्तींना ओळखू शकत नाही. तसेच, सद्यपरिस्थीचेही भान या व्यक्तीला राहात नाही.
बालकृष्ण यांच्या छातीत दुखत होते. त्यानंतर सव्वा चार वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. डॉक्टरांची एक खास टीम आचार्यांच्या देखभालीसाठी ठेवण्यात आली आहे. आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती स्थिरी असून अद्याप काही वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल येणे बाकी असल्याचेही रुग्णालयाचे अधीक्षक ब्रह्मप्रकाश यांनी सांगितले आहे.