नवी दिल्ली – देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच याच शुभमुहूर्तावर आजपासून नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार आहे. नव्या संसदेत आज दुपारी १ वाजल्यापासून कामकाजाला सुरूवात होईल.
केंद्र सरकारने नवीन इमारतीचे काम सुरू करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे 2023 रोजी करण्यात आले. नवीन संसद भवनात आज राज्यसभा आणि लोकसभेची बैठक होणार आहे.
महिला आरक्षण विधेयकात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के किंवा एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अँग्लो-इंडियनसाठी 33 टक्के कोट्यामध्ये उप-आरक्षणाचा प्रस्ताव आहे. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर राखीव जागा फिरवल्या जाव्यात, असा प्रस्ताव या विधेयकात आहे.
महिला आरक्षण विधेयकाला मोदी मंत्रिमंडळाने सोमवारी विशेष अधिवेशनात मंजुरी दिली. केंद्र सरकार लवकरच ते लोकसभेत मांडू शकते, असे मानले जात आहे. महिला आरक्षण विधेयक सभागृहाच्या पटलावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
हा महत्त्वाचा मुद्दा 1996 पासून गेल्या 27 वर्षांत संसदेत अनेकदा मांडला गेला, पण दोन्ही सभागृहात तो मंजूर होऊ शकला नाही. 2010 मध्ये, गदारोळात तो राज्यसभेत मंजूर झाला, पण लोकसभेत तो मंजूर होऊ शकला नाही.
Parliament Special Session LIVE : फोटो सेशन दरम्यान भाजप खासदार बेशुद्ध
संसद भवनातील सर्व खासदारांच्या ग्रुप फोटो सत्रादरम्यान गुजरातमधील भाजप खासदार नरहरी अहीन बेहोश झाले. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सामान्य झाली आणि त्यांनी फोटो सेशनमध्ये भाग घेतला.
#WATCH | BJP MP Narhari Amin fainted during the group photo session of Parliamentarians. He has now recovered and is a part of the photo session. pic.twitter.com/goeqh9JxGN
— ANI (@ANI) September 19, 2023
Parliament Special Session LIVE : राहुल गांधीही पोहोचले
#WATCH दिल्ली: पुराने संसद भवन में संसद सदस्य आज के संसद सत्र से पहले एक संयुक्त फोटो के लिए एकत्र हुए।
सदन की कार्यवाही आज से नए संसद भवन में होगी। pic.twitter.com/251BNkQJNC
— ANI_HindiNews (@AHindinews) September 19, 2023
Parliament Special Session LIVE : तुम्ही असे केले नाही तर आम्हाला सामाजिक न्यायासाठी दीर्घ लढा द्यावा लागेल: महिला आरक्षण विधेयकावर राजद खासदार मनोज झा
#WATCH कैबिनेट बैठक में कोई ब्रीफिंग नहीं हुई…महिला आरक्षण बिल को लेकर अगर सरकार की नीयत साफ है तो हम इसमें और स्पष्टता चाहते हैं। लालू यादव के समय से हमारी पार्टी का मानना है कि अगर आपका विचार प्रतिनिधित्व बढ़ाने का है तो यह तब तक संभव नहीं है जब तक आप एससी, एसटी और ओबीसी की… pic.twitter.com/O7s1CMC7Tj
— ANI_HindiNews (@AHindinews) September 19, 2023
Parliament Special Session LIVE : महिला आरक्षण विधेयकावर सोनिया गांधी म्हणाल्या,’हे आमचे आहे’
– काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जेव्हा संसदेत पोहोचल्या तेव्हा त्यांना महिला आरक्षण विधेयकाबाबत विचारण्यात आले. उत्तरात त्या म्हणाल्या, हे आमचे आहे.
‘भारतीय संसदेचा समृद्ध वारसा आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प’ या कार्यक्रमाचे आयोजन आज सकाळी 11 वाजता होणार आहे.