महापौरांच्या सूचनेनंतर आयुक्तांचे आदेश
पुणे – शहरात सुरू करण्यात आलेली उद्याने पुन्हा बंद करण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे. याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांना सूचना केली होती. त्यावर निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाऊन-5 मधील नियमांची माहिती आयुक्त गायकवाड यांनी दि. 2 जून रोजी जाहीर केली. त्यामध्ये फिरणे आणि जॉगिंगसाठी उद्याने सुरू राहतील, असे नमूद होते. त्यानुसार शहरातील 31 उद्याने उघडण्यातही आली. मात्र, “उद्याने सुरू करू नयेत. त्यामुळे संक्रमण अधिक वाढेल,’ अशी शक्यता महापौरांनी व्यक्त केली होती. तसेच ती बंद करावीत, असे पत्रही आयुक्तांना दिले होते. त्यामुळे उद्यान विभागाने उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.