परिणीती चोप्रा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. परिणितीचा प्रत्येक लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.परिणीतीने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. निऑन कलरच्या बिकिनीमध्ये परिणीतीचा सिझलिंग अवतार पाहून प्रत्येकजण त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहे.परिणितीने समुद्रकिनारी रेतीवर बसून दिलेली पोज अनेकांना चांगलीच आवडली आहे.
View this post on Instagram
या आधी परिणीतीचे वर्कआउट फोटोशूट चांगलेच व्हायरल झाले होते. अभिनेत्रीने जिमनंतरचे तिचे काही फोटो शेअर केले ज्यात ती खूपच हॉट दिसत होती.सध्या परिणीती आगामी ‘कोड नेम तिरंगा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर देखील नुकताच रिलीज झाला आहे.म्हणूनच कदाचित परिणीती आपला प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर थेट मालदिवजला गेली असल्याचे अनेक चाहत्यांनी कमेंट करून म्हंटले आहे.