Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) ‘सैराट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नुकताच तिचा ‘झिम्मा 2’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळाला. यातील रिंकुच्या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक केले जात आहे. यातच आता रिंकूच्या आई-बाबांनी तिला खास सरप्राइज दिलं आहे. सोशल मीडियाद्वारे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
रिंकूच्या आई-बाबांनी तिला आयफोन iphone 15 pro max दिला आहे. याचा फोटो शेअर करत रिंकूने लिहीलं आहे, “या सरप्राइजसाठी आय लव्ह यू आई-बाबा.” याचं स्टोरीच्या पुढे रिंकूने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात आई-बाबा मुलीची काळजी घेताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने लिहीलं की, ‘या पृथ्वीतलावर तुमच्या आई-बाबांपेक्षा अधिक प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकत नाही.’
दरम्यान, रिंकु सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. मध्यंतरी तिचे इन्स्टाग्रामवरील सर्वच पोस्ट गायब झाल्या होत्या. मात्र अचानक तिच्या पोस्ट कशा काय गायब झाल्या? याबाबत तिने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. अनेकांनी तिने सर्व पोस्ट डिलीट केल्याचे म्हंटले होते. त्यानंतर तिने काही कारणामुळे पोस्ट अचानक गायब झाल्याचे सांगितले.
रिंकुच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘सैराट’ या चित्रपटानंतर रिंकू ‘मेकअप’, ‘कागर’ ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात झळकली होती. अभिनेत्री लारा दत्तासोबत तिने ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्येही काम केले होते.