पुणे –शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 28 टीएमसी म्हणजे 96 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या परिसरात पावसाने रविवारी विश्रांती घेतली. पानशेत धरणातून पॉवरहाऊसद्वारे पाण्याचा 600 क्युसेकने विसर्ग सुरू होता. हा विसर्ग रविवारी बंद करण्यात आला आहे.
खडकवासला धरण 100 टक्के भरले असून 1.93 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर धरणातून कालव्याद्वारे 1,155 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर खडकवासला धरणातून आतापर्यंत 4.53 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे. पानशेत धरणही 100 टक्के भरले असून धरणात 10.65 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर वरसगाव धरणाही भरण्याच्या मार्गावर आहे. धरणात 12.30 टीएमसी म्हणजे 96 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर टेमघर धरणात 85 टक्के म्हणजे 3.14 टीएमसी पाणीसाठा आहे.