Pankaj Udhas Passed Away : आपल्या आवाजाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. ते 72 वर्षांचे होते. पंकज उधास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही सुपरहिट आहेत. चिट्ठी आयी है, चांदी जैसा रंग, छुपा ना भी नही आता.. अशी अनेक हिट गाणी पंकज उधास यांनी दिली.
पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. उधास यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. । Pankaj Udhas Passed Away
यावेळी बोलताना गायक सुरेश वाडकर म्हणाले, “पंकज उधास यांच्या निधनाची बातमी खूपच वाईट आहे. त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं हे आम्हाला कोणाचा माहिती नाही. आमची जवळची मैत्री होती. जगाला त्यांनी आपल्या गजलने आनंद दिला आहे.
Ghazal singer Pankaj Udhas dies following prolonged illness, says family
— Press Trust of India (@PTI_News) February 26, 2024
त्यांच्या कुटुंबाचा विचार करुन आता अंगावर शहारे येत आहेत. ते उच्चशिक्षित होते. आज जवळचा मित्र गमावल्याचं दु:ख आहे”. असं भावना त्यांनी व्यक्त केली. Pankaj Udhas | Suresh Wadkar