Ketki Chitle On Manoj Jarange Patil। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये काल दुपारी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायेत. त्यांना माझा बळी हवा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला होता.
त्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र आज त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगण्यात आलं. तसेच, त्यांनी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेले आपलं आमरण उपोषण स्थगित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. । Ketki Chitle On Manoj Jarange Patil
दरम्यान, अश्यातच सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत असणारी अभिनेत्री ‘केतकी चितळे’ हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केलेल्या विधानावरुन भाष्य केलं आहे.
अभिनेत्री ‘केतकी चितळे’ची पोस्ट – । Ketki Chitle On Manoj Jarange Patil
कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक “महापुरुषांनी” एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले,
अशी बातमी ऐकली..! जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये. असो…’ या आशयाची पोस्ट अभिनेत्रीने केली आहे. । Ketki Chitle On Manoj Jarange Patil