मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचे पोस्टर त्यांनी ट्विट करत आज प्रदर्शित केले आहे. अपेक्षेप्रमाणे युध्दाचे आक्रमक प्रसंग, अॅक्शन यांचा संगम या पोस्टरमध्ये दिसून येते आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या पोस्टरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
Sadashiv Rao Bhau vs Ahmad Shah Abdali.
Witness the epic battle on 6th December, #Panipat.@duttsanjay @arjunk26 @kritisanon #SunitaGowariker @RohitShelatkar @Shibasishsarkar @agppl @visionworldfilm @RelianceEnt @ZeeMusicCompany pic.twitter.com/D3oRX1hTbp— Ashutosh Gowariker (@AshGowariker) November 21, 2019
काही दिवसांपूर्वी आशुतोष गोवारीकर यांनी पानीपत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. दरम्यान, मराठा साम्राज्याचा अस्त ज्या युद्धानंतर सुरू झाला त्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे.
या चित्रपटात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या प्रमुख मुख्य भूमिका आहेत.
Presenting the #PanipatTrailer – The Battle That Changed History.
Releasing Dec 6. https://t.co/knKMjAvQAu@duttsanjay @arjunk26 @kritisanon #SunitaGowariker @RohitShelatkar @Shibasishsarkar @agppl @visionworldfilm @RelianceEnt @ZeeMusicCompany— Ashutosh Gowariker (@AshGowariker) November 5, 2019
चित्रपटात अर्जुन कपूरने साकारलेली सदाशिवभाऊंची भूमिका अपेक्षित उंची गाठताना दिसत आहे. पार्वतीबाईंच्या भूमिकेतील क्रिती सॅनॉनला पाहताना बाजीराव मस्तानीतील काशीबाईची आठवण होते. तर संजय दत्तने उभा केलेला अब्दाली जबरदस्त आहे. येत्या 6 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.