श्रीनगर- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या संशयित ठिकाणाला वेढा दिल्यानंतर तेथील दोन दहशतवाद्यांनी नंतर निमुटपणे आपली शस्त्रे खाली ठेऊन शरणांगती पत्करली आहे.
शुक्रवारी रात्री जिल्ह्याच्या काकपोरा भागातील लेलहार येथे हा प्रकार घडला. तेथे काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा जवांनानी त्या परिसराला संपूर्ण वेढा दिला होता.
सुरुवातीला या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करून पळून जाण्याचाही प्रयत्न केला; पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला त्यानंतर मात्र त्यांनी शस्त्रे खाली ठेऊन शरणांगती पत्करली. अकली अहमद लोणे आणि रौफ उल उस्मान अशी त्यांची नावे आहेत. त्यातील लोणे हा जखमी झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.