मुंबई- मुंबईच्या ट्रॉम्बे उपनगरात असलेल्या भाभा अणू संशोधन केंद्रातील एका तरूण वैज्ञानिकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अनुज त्रिपाठी असे या 37 वर्षीय वैज्ञानिकाचे नाव आहे. त्याने आपल्या अणुशक्ती नगर येथील राहत्या घरातच गळफास लाऊन आत्महत्या केली.
आपल्या पत्नीशी किरकोळ कोैटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणानंतर त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने बाथरूम मध्ये गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या पत्नीने आणि अन्य शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले परंतु त्यापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मयत अशी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मात्र कौटुंबिक भांडणे हेच त्यांच्या आत्महत्येच प्रमुख कारण आहे, त्यात बाकी काही घातपात नाही असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.