पुणे – ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता अनेक वर्षांनंतर ‘पांघरुण’ हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता आणि तो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
२ मिनिटे ५६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच स्वातंत्र्य पूर्वीचा काळ, निसर्गयरम्य कोकणचे दर्शन घडते. लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न होते. वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात पाहायला मिळतेय. तिच्या आयुष्याचा संसारिक प्रवास कसा होतो हे हळूहळू उलगडत जाणारी
‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर बहुप्रतीक्षित ‘पांघरुण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. अखेर आज (दि. २४) ‘पांघरून’ चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
पांघरून चित्रपटाचा २ मिनिटे ५६ सेकंदा हा टिझर प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला असून, चित्रपटाच्या टीझरचे विशेष कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. टीझरच्या सुरुवातीलाच स्वातंत्र्य पूर्वीचा काळ, निसर्गयरम्य कोकणचे दर्शन घडते. लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न होते.
वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात पाहायला मिळतेय. प्रेक्षकांना ‘एक विलक्षण प्रेम कहाणी’ पांघरूण मध्ये अनुभवायला मिळणार हे नक्कीच. सध्या सोशल मीडियावर देखील टिझर पाहून प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रया उमटू लागल्या आहेत.