#CWC19 : अतितटीच्या लढतीत पाकचा अफगाणिस्तानवर 3 गडी राखून विजय

लीड्‌स – इमाद वसीम याच्यां नाबाद 49 आणि बाबर आझम याच्या 45 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 3 गडी राखून विजय संपादित केला आहे. विजयासाठीचे 228 धावांचे आव्हान पाकिस्तानने 49.4 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. पाकिस्तानचा सलामीवीर शून्यावर माघारी परतला. त्यानंतर इमाम उल हक आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. इमामने 36 तर आझमने 45 धावा केल्या. शेवटच्या षटकांपर्यत गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तान बाजी मारणार अस वाटत असताना इमाद वसीमने नाबाद 49 आणि वहाब रियाज याने नाबाद 15 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद नाबी आणि मुजीब रहमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दरम्यान, अफगाणिस्तानचा कर्णधार गुलाबदिन नईब याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघास 50 षटकांत 9 बाद 227 पर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानकडून गोलंदाजीत शाहीन आफ्रिदीने 10 षटकांत 47 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर वहाब रियाज आणि इमाद वसीम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.