पाक विमान अपघातातील दोघे बचावले

कराची – काल कराचीमध्ये झालेल्या विमान अपघातात 97 जण मरण पावले. मात्र दोन प्रवासी मात्र अत्यंत आश्‍चर्यकारकरितीने बचावल्याचे निष्पन्न झाले आहे. अत्यंत दाटीवाटीच्या रहिवासी भागामध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे विमान कोसळून हा अपघात झाला होता. बचावलेल्यांमध्ये बॅंक ऑफ पंजाबचे अध्यक्ष झफर मसूद यांचाही समावेश आहे.

अपघातग्रस्त विमानातून 97 मृतदेह बाहेर काढले गेले आहेत आणि दोन प्रवासी या दुर्घटनेत बचावले आहेत, असे बचाव आणि मदत कार्यात सक्रिय असलेल्या पाकिस्तान सैन्याने सांगितले. लष्कराच्या शोध आणि बचाव पथक, रेंजर्स आणि स्वयंसेवी संघटनांकडून बचाव कार्य सुरू आहे. अपघातामुळे हानी झालेली 25 घरे रिकामी केली गेली आहेत. या घरांमधील रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था अन्यत्र करण्यात आली आहे, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी ट्‌वीट केले आहे.

या अपघातातील सर्व मृतांच्या नातेवाईकांना दिली जाणारी नुकसान भरपाई दुपटीने वाढवून 10 लाख रुपये केली गेली आहे. जमिनीवरील ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. विमानाचा ब्लॅक बॉक्‍सही सापडला असून तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला गेला. असेही ते म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×