बीजिंग: एफएटीएफने पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारल्यानंतरही चीनला आपल्या त्या मित्राचा पुळकाच असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. टेरर फंडिंग रोखण्यासाठी पाकिस्तान पुष्कळ प्रयत्न करत असल्याचे कौतुक चीनने केले. पाकिस्तानच्या प्रयत्नांची दखल एफएटीएफच्या सदस्यांनी घेतली. त्यातून पाकिस्तानला आणखी वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. दहशतवादाविरोधात आणखी पाऊले उचलण्यासाठी आम्ही पाकिस्तानला मदत करू, असे चीनने म्हटले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीन अनेकदा पाकिस्तानच्या मदतीला धावून जात असल्याचे पाहावयास मिळते.