पिंपरी -पैशांसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना गायकवाड नगर, दिघी येथे घडली. याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती भागवत श्रीरंग खरात (वय 23), सासरे श्रीरंग खरात, दीर केशव श्रीरंग खरात, कृष्णा श्रीरंग खरात, जाऊ (सर्व रा. दुधगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी) नणंद आणि नणंदेचे पती अभिमान अर्जुन शिंदे (दोघेही रा. समर्थ नगर, दिघी) दुसरी नणंद (रा. शहापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत 22 वर्षीय विवाहितेने रविवारी (दि. 22) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 14 ऑगस्ट 2021 ते 25 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये गायकवाड नगर, दिघी येथे घडली. फिर्यादी विवाहिता या सासरी नांदत असताना आरोपींनी पतीला व्यवसाय करण्यासाठी माहेरावरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी व त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.