मुंबई – समाज माध्यमावर देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्याचे वडील मोतीलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर प्रकरण अभिनेत्री पायल रोहतगीला चांगलंच महागात पडलं होत.
वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल रोहतगीला पोलिसांनी बुंदी येथून १५ डिसेंबरला अटक केली होती. मात्र, जेलमध्ये एक रात्र घालवलेल्यानंतर तिला न्यायालयाने 25 हजार रुपयेच्या जातमुचलक्यांवर त्यांची सुटका केली.
सुटकेनंतर जेलमध्ये घालवलेल्या त्या एका रात्रीविषयी बोलताना पायल म्हणाली, ‘जेलमध्ये खूपच थंडी होती. तसेच ते जेल खूप घाणेरडं होतं. हे खूपच भीतीदायक होतं. त्यातही मला थंड जमिनीवर चटई अंथरुण झोपावं लागलं. मी आशा करते की माझ्या आयुष्यातला हा शेवटचा अनुभव असावा. मी फिमेल जनरल वॉर्डमध्ये होते. तिथे माझ्यासोबत अनेक महिला होत्या त्यांनी त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केले ज्यामुळे मी खूप भावूक झाले होते.’ असं तिने सांगितलं.