न्यूयॉर्कमधील एका मॅगझीनने भारतीय वंशाची सुपर मॉडेल पद्मा लक्ष्मी आणि प्रियांका चोप्रा यांच्यामध्ये गल्लत केली. या मॅगझीने पद्मा लक्ष्मीला प्रियांका चोप्रा समजून टॅग केले. पद्माने ही चूक लक्षात आल्यावर चुकीवर एक कार्टूनही पोस्ट केले आहे. पद्मा ही न्यूयॉर्कमधील सेलिब्रिटी कार्टून टेकओव्हर या अंकाशी संबंधित आहे. या अंकाने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या एका अंकामध्ये तिचा फोटो पोस्ट केला आणि खाली प्रियांका चोप्राचे नावही लिहीले गेले आहे.
पद्माला ही चूक लक्षात आल्यावर तिने या फोटोचा स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आणि मॅगझीनला धन्यवादही दिले आहेत. “मी आणि प्रियांका सारख्याच दिसतो, हे मला माहिती आहे.’ असेही तिने म्हटले आहे. हॅश टॅग देसीलाइफ आणि हॅश टॅग जस्ट इंडियन थिंग्ज’ असे तिने म्हटले आहे. या मॅगझीनच्या फोटोमध्ये पद्माचा ब्लॅक ऍन्ड व्हाईट फोटो आहे. मॅगझीनच्या ऑनलाईन एडिशनमधून हा फोटो हटवण्यात आला आहे. मात्र या चुकीबद्दल मॅगझीनला खूप ट्रोल केले गेले होते. या संदर्भात देसी गर्ल प्रियांका चोप्राकडून मात्र कोणतीच प्रतिक्रिया अद्याप उजेडात आलेली नाही.