‘या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं !’

पाटील यांनी राज्य सरकारला विचारला खोचक प्रश्न

मुंबई –  भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवलं सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं ! असं ट्विट करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच चंद्रकांत पाटील यांनी लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं !  असा प्रश्न ट्विट करत विचारला आहे.

दरम्यान,मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी याच मुद्द्यावरून सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पाटील यांनी  राज्य सरकारवर टोलेबाजी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.