पिंपरी – कोळीये (ता. खेड) येथे पार पडलेल्या कुस्ती आखाड्यात आकुर्डी येथील पै. पवन माने 25 हजार रुपयांची कुस्ती व चांदीची गदा पटकाविली. त्याच्या या यशाचे अभिनंदन होत आहे.
एक नंबरच्या कुस्तीसाठी 25 हजार रुपये इनाम व चांदीची गदा ठेवण्यात आली होती. आकुर्डीचा पैलवान पवन माने व हनुमान आखडा वडगाव धायरीचा पैलवान शाहरुख शेख यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या कुस्तीमध्ये पवनने शाहरूख शेख याच्यावर मच्छी गोता डावावर आसमान दाखवले. गावाच्या वतीने 25 हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली. शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पधेमध्ये कास्यपदक विजेता आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये 79 किलो वजन गटात माती विभागात पवन पिंपरी चिंचवड शहराचे नेतृत्व करणार आहे. दुसऱ्या लढतीत पै. अमोल माने याने अटीतटीच्या कुस्ती कुस्ती मध्ये संग्राम पाटील या मल्लावर गदा लोट या डावावर विजय मिळवला. आकुर्डी गावातून पवनचे कौतुक होत आहे. अमोल आणि पवन हे राजा शिवछत्रपती कुस्ती प्रशिक्षण केंद्र आकुर्डी येथे राष्ट्रीय खेळाडू पै. राजेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.