दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची बोइंग विमान खरेदी प्रकरणी ईडी ने (अंमलबजावणी संचालनालय) आज सहा तास चौकशी केली. एअर इंडियाच्या 43 विमानांच्या खरेदीसंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पी चिदंबरम यांना 23 ऑगस्ट रोजी समन्स बजावले होते. सीबीआयने पी. चिदंबरम 20 ऑगस्ट रोजी अटक केली होती.
यूपीए सरकारच्या काळात एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात ऑक्टोबर 2018 मध्ये गुन्हे दाखल झाले होते.
Enforcement Directorate (ED) sources: Congress leader and former Union Minister P Chidambaram is being questioned by ED, in connection with the alleged deal and purchase case of Airbus and Boeing plane for Air India pic.twitter.com/Q8cR0bEYZc
— ANI (@ANI) January 3, 2020
यूपीए सरकारच्या कारकीर्दीत हवाई वाहतूक संबंधित कथित आर्थिक अनियमितता असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे (ईडी)ने शुक्रवारी चौकशी केली.