कोविड-19 साठी ओझोन व पंचाग थेरपी यशस्वी

कोविड-19 अखेर वर्ष 2020 सरले! नॉव्हेलकोरोना विषाणूमुळे फैलावलेल्या “कोविड-19 या महाभयंकर साथीने संपूर्ण जगाला मुळापासून नुसते हादरवलेच नाही; तर समस्त मानव जातीच्या जगण्या-वावरण्याच्या पद्धती, सवयी आणि मानके संपूर्णपणे बदलून टाकली. नोव्हेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान प्रांतामध्ये एक अज्ञात विषाणू आपले प्रताप दाखवीत असल्याच्या बातम्यांनी ही दीर्घ शोककथा सुरू झाली. पुढील काही आठवड्यांतच हा विषाणू सर्वत्र पसरून एक अभूतपूर्व थैमान सुरू झालं. जगाच्या पाठीवरील कुठलाही देश त्याच्या तडाख्यातून वाचू शकला नाही.

कोविड-19 हा आजार जेव्हा गंभीर स्वरूप धारण करतो, तेव्हा रुग्णाला व्हेन्टिलेटर आणि ऑक्‍सिजनची नितांत गरज भासते. या मुलभूत सोयीसुविधांबाबत  संपूर्ण देशातच वानवा होती. मुंबई-पुण्यामध्ये तर कोविड- भीषण वेगाने पसरला. लोकमान्य हॉस्पिटलमध्ये एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान लहान बाळांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत कोविड-19 चे तब्बल तीन हजारांहून अधिक रूग्ण दाखल झाले होते. 

सुरुवातीस दाखल झालेल्यांपैकी आयसीयूची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त तर होतीच, शिवाय त्यांच्यातील मृत्यूदर देखील अधिक होता. लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉ. रोहन काटे, डॉ. जयवंत श्रीखंडे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, केदार वळसंगकर, इतरही अनेक डॉक्‍टस्‌र्, नर्सेस्‌, सपोर्ट स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ यांनी व्यक्तिगत आयुष्याची जरादेखील पर्वा न करता महिनोन्महिने सर्व रुग्णांची अक्षरश: दिवस-रात्र सेवा केली.

परिस्थिती अतिशय गंभीर अशीच होती. अशा वेळी कोविड- रुग्णांवर “सपोर्ट थेरपी म्हणून ओझोन फोरम ऑफ इंडियामधून “ओझोन थेरपी ट्रायल्स्‌’ तर आणखी एका संस्थेकडून “पंचगव्य ट्रायल्स’ घेण्याविषयी “लोकमान्यला विनंती करण्यात आली. भारतात कोणत्याही औषधाचा रुग्णांवर प्रयोग (ट्रायल्स्‌) करण्याआधी केंद्र सरकारच्या अंतर्गत दिल्लीमध्ये कार्यरत असलेल्या “क्‍लिनिकल ट्रायल रजिस्ट्री’ कडून रीतसर पूर्वपरवानगी घ्यावी लागते. कोणत्याही रोगावरील उपचारांसाठी संशोधक्‍न करताना ही परवानगी घेणे आवश्‍यक असते.

म्हणूनच लोकमान्यने “ट्रायल्स्‌’ हा विषय वैदयकीय आचारसंहितेनुसार एथिकल कमिटी समोर ठेवून आधी त्यासाठी मान्यता घेतली व नंतर दिल्लीस्थित “क्‍लिनिकल ट्रायल रजिस्ट्री’कडे परवानगी मागितली. नंतर त्वरित लोकमान्यचे डॉ. रोहन काटे आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहकारी डॉक्‍टर्सची टीम बनवून सदर ट्रायल्स्‌ सुरू करण्यात आल्या. डॉ. गायत्री गानू यांनी या संबंधी क्‍लिनिकल रिसर्चचे अतिशय जोखमीचे काम जबाबदारीने पार पाडले.

काय आहेत ओझोन थेरपी ट्रायल्स्‌?
ओझोन वायू रक्तात मिसळून अथवा रेक्‍टल इन्सफ्लेशन द्वारे रुग्णाच्या शरीरात सोडला जातो आणि त्याच्या परिणामांचा अत्यंत काटेकोरपणे अभ्यास केला जातो. हृदयाची स्पंदने, ऑक्‍सिजन पातळी, रक्तदाब यांसहित इतरही अनेक बारीकसारीक गोष्टींची वारंवार नोंद घेतली जाते आणि त्यातील बदल अत्यंत बारकाईने अभ्यासले जातात. त्यानुसार प्रत्येक रुग्णासाठी ओझोन वायूचे प्रमाण ठरवले जाते.

रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रुग्णांवर इंडियन मेडिकल असोसिएशनने आखून दिलेल्या चौकटीतील उपचार चालूच होते. सर्वप्रथम त्यासाठी रुग्णांचे दोन गट करण्यात आले. पैकी एका गटाला फक्त नियमित उपचार तर दुसर्या गटाला नियमित उपचारांच्या जोडीने “ओझोन थेरपी’ देण्यात आली.

या प्रयोगाचे परिणाम केवळ थक्क करणारे होते. ओझोन थेरपी घेणाऱ्या 77 टक्के रुग्णांचा पहिल्या पाच दिवसांतच कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आला तर उर्वरित 22 टक्के रुग्ण पुढच्या दहा दिवसांत निगेटिव्ह रिपोर्ट व डिस्चार्ज घेऊन घरी गेले. थोडक्‍यात, या प्रयोगाचा सक्‍सेस रेट (यशस्विता) 100 टक्के इतका नोंदला गेला. विशेष म्हणजे, ओझोन गटातील रुग्णांपैकी एकालाही व्हेन्टिलेटर अथवा आयसीयूची गरज भासली नाही. मात्र ज्या रुग्णांना केवळ नियमित उपचार दिले गेले, त्यांतील 30 टक्के रुग्ण पहिल्या दहा दिवसांनंतर देखील पॉझिटीव्ह आढळले, 10 टक्के रुग्णांना आयसीयूत दाखल व्हावे लागले तर दोन टक्के रुग्णांचा मृत्यू झाला.

ओझोन थेरपी रुग्णांच्या पोस्ट-कोविड तक्रारी देखील कमीत कमी आढळल्या. त्यांचे एकूण “जीवनमानाचा दर्जा हे दुसर्या गटातील रुग्णांच्या तुलनेत खूपच जास्त चांगल्या स्थितीत असल्याचे आढळले अशी खातरजमा खुद्द त्या रुग्णांनीच केली आहे. या सर्वांच्या तब्येतीवर थेरपीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत.

पंचगव्य ट्रायल्स्‌
याचप्रमाणे “पंचगव्य’च्या जोडीने हर्बल एक्‍स्ट्रॅक्‍टस्‌ वापरून असाच मान्यताप्राप्त प्रयोग करण्यात आला. “पंचगव्य थेरपी’ घेतलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 70 टक्के जणांचा रिपोर्ट पहिल्या तीन ते पाच दिवसांतच निगेटीव्ह आढळला. उर्वरित 30 टक्के रुग्ण दहा दिवसांतच बरे होऊन घरी गेले. या सगळ्या प्रयत्नांचा अपेक्षित परिणाम झाला आणि कोविड-19 रुग्णांचा सर्वात कमी मृत्यूदर “लोकमान्य’ मध्ये दिसून आला. भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत लेखात तसेच वेबसाईटवर “लोकमान्य’च्या नावानिशी केंद्र सरकारच्या प्रतिनिधीद्वारा या चाचण्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे.

भारताच्या “आयुष’ मंत्रालयाने आयुर्वेद, होमिओपथी, युनानी वगैरे पारंपरिक उपचारपद्धतींना चालना मिळावी या हेतूने आखून दिलेल्या चौकटीतच हे सगळे उपचार नोंदले गेले. या सर्व अभिनव उपचारपद्धती केवळ लोकमान्य हॉस्पिटलमध्येच अवलंबण्यात आल्या आणि त्याचा शेकडो रुग्णांना पुरेपूर फायदा देखील मिळाला.

अत्यंत कमी खर्चातील थेरपीज्‌
भारतासारख्या प्रगतिशील देशामध्ये वैद्यकीय उपचारांचा खर्च हा कायमच कळीचा मुद्दा ठरतो. तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यास, या थेरपीज्‌ साठी येणारा खर्च हा देशातील कोणत्याही नागरिकास सहज परवडेल इतक्‍या कमी किंमतीत “लोकमान्यमध्ये उपलब्ध आहे.

पोस्ट-कोविड केअर सेंटरची आवश्‍यकता
कोविड-19ची साथ एव्हाना काहीशी आटोक्‍यात आलेली असली, तरीसुद्धा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. पुण्यामध्ये यामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या खूपच जास्त आहे. या रुग्णांशी चर्चा केल्यानंतर बहुतेकांमध्ये तब्येतीच्या अनेक तक्रारी कॉमन स्वरूपांत आढळल्या आहेत.
“पोस्ट-कोविड लक्षणे  केस गळणे, शक्तीपात किंवा कमालीचा वीकनेस, अंगदुखी, स्नायूदुखी, थकलेपणा येणे, सतत अंथरूणातच पडून राहावे असे वाटणे, दम लागणे, भूक न लागणे, लघवीच्या तक्रारी, वास येण्याची क्षमता कमी होणे, इत्यादी तक्रारी बव्हंशी रुग्णांनी नमूद केल्या आहेत. 

अशा सर्व रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि त्यांचे आरोग्य पुन्हा पूर्वीइतकेच सुधारणे, याच हेतूने “लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटरने (ङचठउ) चिंचवड येथील हॉस्पिटलमध्ये अतिशय होलिस्टिक अन्‌ अद्ययावत असे “पोस्ट-कोविड केअर सेंटर’ नुकतेच सुरू केले आहे. यामध्ये कोविडशी संबंधित सर्व रूटीन ट्रीटमेन्ट सहित पंचगव्य, ओझोन, पंचकर्म यांसारख्या सपोर्ट थेरपीज्‌ देखील कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ज्यांना कोव्हिड-19 ची लक्षणे आढळत असतील, त्या सर्व रुग्णांसाठी हे एक वरदान आहे. ज्यांना अशा कोव्हिड-19 विषयी समस्या आहेत, त्यांनी अवश्‍य संपर्क साधावा.
संचालक, लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर
(पोस्ट कोव्हिड सेंटर)
फोन : 8446623333
पत्ता : 314/बी, चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ, टेल्को रोड, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र 411033

लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटरच्या संशोधनाला मान्यता
– डॉ. वि. गो. वैद्य

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.