टायो निप्पॉन, लिंडे कंपन्यांमधून ऑक्‍सिजन पुरवठ्याला सुरुवात

पुणे -जिल्ह्याला ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्या तांत्रिक कारणामुळे बंद पडल्या होत्या. मात्र, त्या बुधवारी पुन्हा सुरू झाल्या. जिल्ह्यातील टायो निप्पॉन आणि तळोजा येथील लिंडे या कंपन्यांमधून ऑक्‍सिजन पुरवठ्याला सुरुवात झाली आहे. 

टायो निप्पॉन कंपनीकडून 14 मेट्रिक टन, तर लिंडे कंपनीतून 15 मेट्रीक टन प्राणवायूचा पुरवठा बुधवारी करण्यात आला. या दोन्ही कंपन्यांमधील ऑक्‍सिजननिर्मिती बंद पडल्यामुळे पुण्यात प्राणवायूचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता होती. मात्र, फ्रान्स सरकारने दिलेल्या 40 मे. टनपैकी 30 मेट्रीक टन आणि ओडिशा येथून रेल्वेने 58 मेट्रीक टन प्राणवायू पुण्याला तातडीने उपलब्ध झाल्याने प्राणवायू तुटवड्याचे संकट टळले.

 ओडिशातील अन्गुल येथून रेल्वेने चार टॅंकर मागवले. रेल्वेने नागपूरमार्गे मंगळवारी रात्री मध्यरात्री लोणी स्थानकावर ही रेल्वे आली. त्यानंतर मागणीनुसार ऑक्‍सिजनचे वितरण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.