सातारा -जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 67 नागरिकांना दहा दिवसांनतर मंगळवारी घरी सोडण्यात आले तर 597 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच वाई तालुक्यातील एक पुरुष व सातारा तालुक्यातील एक पुरुष व एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये वाई तालुक्यातील वाई येथील 52 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 22 वर्षीय पुरुष, 20 व 32 वर्षीय महिला व 9 वर्षाची बालिका, सोनगीरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला., कराड तालुक्यातील तारुख येथील 26 वर्षीय महिला, 2 वर्षाची दोन बालके, मलकापूर येथील 64 वर्षीय पुरुष, यादववाडी (मसूर) येथील 43 वर्षीय पुरुष, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, कारवडी येथील 28 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील जिहे येथील 61 वर्षीय महिला, कोडोली येथील 10 व 8 वर्षाची बालके, 30 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय महिला व 23 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 32 वर्षीय महिला, शहापूर येथील 28 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 45 वर्षीय पुरुष., खंडाळा तालुक्यातील अष्टविनायक ग्लास फॅक्ट्री येथील 18 वर्षीय तरुण.,
जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 39, 42, 59, 33, 31, 29, 93, 50, 19, 64, 30, 34, 43, 38, 23, 50, 23, 43 वर्षीय पुरुष व 56, 26, 60, 50, 59, 35 वर्षीय महिला व 7, 12, 7, 5 व 7 वर्षाच्या बालिका, 18 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण, 3 व 10 वर्षाचा बालक, सायगाव येथील 17 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, आलेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालक, 11 वर्षीय बालिका व 35 वर्षीय महिला, दापवडी येथील 29 व 56 वर्षीय पुरुष., माण तालुक्यातील
गोंदवले बुद्रुक येथील 21 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 40, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 81, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 12, कोरेगाव 12, वाई 46, शिरवळ 17, रायगाव 26, पानमळेवाडी 93, मायणी 42, महाबळेश्वर 10, पाटण 54, खावली 74 व कृष्णा हॉस्पिटलमधील 90 अशा एकूण 597 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे व कराड येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.