सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना दहा दिवसांनतर बुधवारी घरी सोडण्यात आले. तर 450 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 2 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील कापील येथील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, कालवडे येथील 30 वर्षीय महिला, खंडोबानगर (मलकापूर) येथील 4 वर्षीय बालक, वडगाव हवेली येथील 43 वर्षीय पुरुष.,
पाटण तालुक्यातील नेरले येथील 23 वर्षीय पुरुष, कासरुंड येथील 12, 17 वर्षीय युवती व 35 वर्षीय महिला, निगडे येथील 45 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील वेळे येथील 40 वर्षीय महिला.,
सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 22, 40, 40, 34, 90, 40, 25, 62, 30, 54, 18, 40, 37 वर्षीय महिला व 51, 50, 40, 56, 55, 7, 22, 11, 36, 5, 57, 16, 12, 16, 65 वर्षीय पुरुष, तामजाईनगर सातारा येथील 44 वर्षीय महिला, लक्ष्मी टेकडी येथील वय 56, 18, 7, 42 वर्षीय महिला व 42, 35 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 44, 20, 42 वर्षीय महिला व 47, 19, 38, 54 वर्षीय पुरुष,
रामकुंड येथील 10 वर्षीय बालक, प्रतापगंज पेठेतील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 29 वर्षीय महिला व 32 वर्षीय पुरुष., महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 23, 38 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष., जावळी तालुक्यातील सायगाव येथील 36 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला., फलटण तालुक्यातील फलटण शहरातील गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.