भोपाळ : मध्य प्रदेशच्या राजभवनात शिवराजसिंह चौहान मंत्रीमंडळाच्या 28 सदस्यांचा शपथविधी गुरूवारी पार पडला. त्यात सिंदिया गटाचे 12 सदस्य आहेत. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना शपथ दिली.
या मंत्रीमंडळात 20 कॅबिनेट आणि आठ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. गोपाल भार्गव, विजय शहा, जगदिश देवरा, बिसाहूलाल सिंह,यशोधरा राजे सिंदिया, भूपेंद्र सिंह, इदलसिंह कानसाना, ब्रिजेंद्र प्रताप सिंह, विश्वास सारंग, इम्रती देवी, प्रभुराम चौधरी, महेंद्रसिंह सिसोदिया, प्रद्युम्नसिंह तोमर, प्रेमसिंह पटेल, ओमप्रकाश साकलेचा, उषा ठाकूर, अरविंद भदोरीया, मोहन यादव, हरदीपसिंग डंग, राज्यवर्धनसिंह दित्तीगाव यांचा शपथविधी झाला. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, माजी केंद्रीयमंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यावेळी उपस्थित होते.