नवी दिल्ली – ऑस्कर पुरस्काराकडे कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्या देखील हातात असावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. भारतासाठी यंदाचा हा सोहळा खूप खास ठरला आहे.
याच कारण म्हणजे ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे. तर दुसरीकडे ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्टफिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. या कामगिरीमुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. नुकतंच, ‘आरआरआर’ संपूर्ण टीम भारतात परतली आहे.
यावेळी चित्रपटाची टीम ‘एसएस राजामौल, एमएम कीरावानी, ज्युनियर एमटीआर आणि राम चरण’ यांचं विमानतळावर जंगी स्वागतही करण्यात आलं होतं. सध्या आरआरआरच्या टिमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच चित्रपटाचा लीड स्टार राम चरण आणि त्याचे वडील तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी हे शुक्रवारी दिल्लीत उपस्थित होते.
Thank you Shri @AmitShah ji for your Hearty Wishes & Blessings to @AlwaysRamCharan on behalf of Team #RRR for a successful Oscar Campaign & bringing home the First ever Oscar for an Indian Production! Thrilled to be present on this occasion! #NaatuNaatu #Oscars95@ssrajamouli pic.twitter.com/K2MVO7wQVl
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) March 17, 2023
यादरम्यान राम चरण आणि चिरंजीवी यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो दोन्ही कलाकरांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहेत. एवढेच नाही तर खुद्द अमित शाह यांनीही त्यांच्या ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहे. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज चिरंजीवी आणि राम चरण यांना भेटून आनंद झाला. तेलगू चित्रपट उद्योगाचा भारताच्या संस्कृतीवर आणि अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला आहे. नाटू-नाटू गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्याबद्दल आणि ‘आरआरआर’ च्या उत्तुंग यशाबद्दल राम चरणचे अभिनंदन.” असं अमित शाह म्हणाले आहेत.
Delighted meeting @KChiruTweets and @AlwaysRamCharan – two legends of Indian Cinema.
The Telugu film industry has significantly influenced India’s culture & economy.
Have congratulated Ram Charan on the Oscar win for the Naatu-Naatu song and the phenomenal success of the ‘RRR’. pic.twitter.com/8uyu1vkY9H
— Amit Shah (@AmitShah) March 17, 2023
तर, गृहमंत्री अमित शाह यांच्या या ट्विटला अभिनेते चिरंजीवी यांनी री-ट्विट करत उत्तर दिल आहे. चिरंजीवी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “राम चरणला तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी धन्यवाद. चिरंजीवीनेही ‘आरआरआर’ च्या संपूर्ण टीमच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.