ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाचा खात्मा : अमेरिकन माध्यमांचा दावा

वॉशिंग्टन : अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनला ठार केले आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. याविषयी अमेरिकेच्या माध्यमांनी माहिती दिली आहे. परंतू, हमजाला कधी आणि कसे मारले याविषयी कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

अमेरिकेच्या एनबीसी न्यूजने याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, दहशतवादी कृत्य करणाऱ्या हमजाला आम्ही ठार केले आहे. अमेरिकेकडून 2017 च्या दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यात हमजाचे नाव आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमजाविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या प्रशासनाकडून त्याच्यावर एक मिलीयन डॉलरचे बक्षिस ठेवण्यात आले होते त्यानुसार दहशतवाद्यांच्या वॉंटेड लिस्टमध्ये तो किती महत्वाचा होता हे लक्षात येते. ओसामा बिन लादेनला एकूण 20 मुल होती त्यापैकी हमजा हा 15 वा होता, हमजाला आपल्या वडिलांच्या मृत्युचा बदला घ्यायचा होता त्यासाठी तो इतर देशांना दहशतवादी हल्ल्याच्या धमक्‍या देत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.