ठोसेघर – सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास बामणोली हा परिसर वर्षाऋतुतील पर्यटनासाठी देशाभरात नावारूपाला आला आहे. कास पठाराच्या पश्चिमेस असणार एकीवचा धबधबा गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांसाठी आर्कषणाचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे.
कास पुष्प पठाराच्या अलीकडे असणाऱ्या पारंबे फाट्यावरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या निसर्गरम्य धबधब्याचे नयनरम्य दर्शन रस्त्यावर उभे राहूनही घेता येते. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबा फेसाळुन वाहत असल्याने पर्यटक विशेषतः तरूणाई याठिकाणी गर्दी करत पहायला मिळत आहे.