मुंबई – अभिनेता सलमान खानने आपल्या आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी कि जान’ बाबत महत्वाची अपडेट दिली आहे. या चित्रपटातील सलमानचा पहिला लूक रिव्हील झाल्यापासून चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. म्हणुनच स्वतः सलमान खानने फॅन्ससाठी चित्रपटाबाबत महत्वाची माहिती सोशल मीडियावर शेअर केलीय आहे.
शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होताना किसी का भाई किसी कि जानचा टीजर देखील प्रेक्षकांसमोर आला होता. टीजरवरून चित्रपट ऍक्शन कॉमेडी सिनेमा असल्याचे समजते. आता सर्वांना चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा लागलेली आहे. अशात सलमानने चित्रपटाचे उर्वरित शूटिंग देखील पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे.सलमानने ही घोषणा करत आपला नवा लूक देखील फॅन्ससोबत शेअर केला आहे.
या चित्रपटात सलमान किती वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. टीजरमध्ये सलमान दोन वेगळ्या लुक्समध्ये दिसून येत आहे. एकामध्ये त्याचे केस आणि दाढी खूप वाढलेली दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये तो क्लीन शेवमध्ये दिसत आहे. अशात फॅन्सने त्याला सोशल मीडियावर चित्रपटाबाबत अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
सलमान खानने आपल्या सलमान खान प्रोडक्शन अंडर चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत व्यंकटेश दगुबट्टी, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.