मेट्रो कोचेसचा मार्ग मोकळा

“टिटागर्ह फिरेमा’ कंपनी करणार काम
देशात प्रथमच होणार मेट्रो डब्यांची निर्मिती 

पुणे – पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गांचे काम वेगाने सुरू असतानाच मेट्रोचे डब्यांचा (कोच) मार्गही मोकळा झाला आहे. या दोन्ही मार्गांसाठी सुमारे 102 कोचची आवश्‍यकता असून ते कंत्राट “टिटागर्ह फिरेमा’ या बहुराष्ट्रीय कंपनीला प्राप्त झाले असून, संपूर्णत: ऍल्युमिनियमच्या वापरातून या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे.

एका बाजूला मेट्रो प्रकल्पाच्या कामाने वेग पकडलेला असतानाच, ही निविदाही मार्गी लागल्याने कामास आणखी वेग येणार आहे. या डब्यांच्या निर्मितीसाठी सुमारे 1 हजार 125 कोटींचा खर्च अपेक्षित असून ऍल्युमिनियमचा वापर करून मेट्रोच्या डब्यांची निर्मिती भारतात प्रथमच होणार आहे. हे डबे स्टील डब्यांच्या तुलनेत वजनाने हलके आणि सुरक्षित असतील. तसेच, या डब्यांमुळे उर्जेचा माफक वापर होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.