भवानी माता मंदिरापासून प्रचारास सुरुवात
पुणे कॅन्टोन्मेंट – मागील पाच वर्षांपासून मतदारसंघातील सततचा संपर्क, सरकारविरोधी आंदोलने, मित्रपक्ष व सहानुभूतीदार यांची बांधलेली पक्की मोट या मला विजयापर्यंत घेऊन जाण्यास सक्षम असल्याने संपूर्ण प्रचार कालावधीत आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देणार आहोत, असे सांगत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन मित्र पक्षाचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराचा नारळ रविवारी ग्रामदैवत भवानी माता मंदिर येथे फोडण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, जयदेव गायकवाड, कमलताई ढोले पाटील, पी. ए. इनामदार, अंकुश काकडे, रिपब्लिकनचे राहुल डंबाळे, नगरसेवक प्रशांत जगताप, अभय छाजेड, शिवाजी केदारी, प्रदीप जगताप, लताताई राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, अजित दरेकर, रवींद्र धंगेकर, रफिक शेख, चॉंदबी नदाफ, विनोद मथुरावाला, करण मकवाना, मंजूर शेख, रजनीताई त्रिभुवन, संगीता तिवारी, संगीता पवार, भोलासिंग अरोरा, विठ्ठल गायकवाड, गौतम महाजन सोनाली मारणे, शर्वरी गोतरणे, शिला रतनगिरी, दीपक रामनानी, विशाल मलके, साहिल केदारीसह मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बागवे म्हणाले, “गेल्या पाच वर्षांत युतीच्या काळात कोणतेही सकारात्मक निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे सर्व सामान्यांचे प्रश्न आहे, तसेच आहेत. याउलट आघाडीने सुरू केलेल्या अनेक समाजोपयोगी बंद पडल्या आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबाबत रोष असून या नकारात्मकतेला आपण सकारात्मक प्रचाराने उत्तर देणार आहोत.’