संत रोहिदास महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर
रेडा- संत रोहिदास महाराज यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या विचाराने मानवी जीवनात आनंद मिळतो आहे, मात्र मन स्वच्छ असेल तरच मानवी जीवनाला अर्थ आहे. ही शिकवण पाळण्याची जबाबदारी जनतेची आहे, अशी मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केले.
इंदापूर शहरातील हराळे वैष्णव व संत रोहिदास महाराज मित्र मंडळ यांच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, धनंजय बाब्रस, सुधीर मखरे, प्रशांत सिताप, डॉ.विनोद राजपुरे, डॉ. दत्तात्रय गार्डे, डॉ. लामतुरे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश गणबोटे, दुर्वास शेवाळे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचा सन्मान हराळे वैष्णव व संत रोहिदास महाराज मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आला.